You are currently viewing माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत वाढत्या महागाई विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत वाढत्या महागाई विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

कुडाळ :

 

कुडाळात आज एस. एन. देसाई चौक येथे राष्ट्रवादीच्या कोंकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाई विरोधात महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे टाळ मृदंग घेऊन भजन करत आंदोलन करण्यात आले.  यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले उपस्थित होते.

इंधन,गॅस, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात महिलांचे आंदोलन करण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी लोकनेते सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात केलेल्या व्यक्तव्यविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

या आंदोलनात अबिद नाईक, पुंडलिक दळवी, संदीप राणे, संतोष जोईल, अफरोज राजगुरू, नम्रता कुबल, प्रज्ञा परब, रिद्धी परब, स्नेहल पाताडे, शुभांगी साटम, सायली पेंडुरकर, रिया भांबुरे, दर्शना देसाई, आर .के .सावंत, चित्रा बाबर, शिल्पा परब आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा