खासदार, पालकमंत्री, आमदार जवळचे असताना पदाधिकाऱ्यांना हेतुपुरस्सर कसे काय गोवले जाते?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे असताना गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांची गाडी महाराष्ट्र हद्दीत इन्सुली येथे अडवली जाते… गाडीत ड्राइवर असेपर्यंत कोल्हापूर येथील भरारी पथक गाडीवर कारवाई करत नाही?…गाडी मालक गाडीत बसताच हेतुपुरस्सर गाडी मालक शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याला गोवले जाते?….परंतु जेव्हा कारवाई झाली त्यावेळी सर्व सत्ता आपलीच असताना खासदार, पालकमंत्री, आमदार जबाबदार लोकप्रतिनिधींनी नाहक कार्यकर्त्यांवर कारवाई होत असताना सहकार्य का केलं नाही????? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते…”गाडीवर त्यांचा लक्ष होता…गाडी थांबविण्याचा इशारा केला परंतु गाडी न थांबताच पुढे निघून गेली…त्यावेळी पाठलाग करून गाडी पकडली..आणि कारवाई केली. कारवाई करताना दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला…” सोशल मिडियामध्येही तशाप्रकारे लिहून आलेलं…मुख्य म्हणजे एखाद्या गाडीतून प्रथमच दारू वाहतूक झाली तर ती शक्यतो राज्य उत्पादन खात्याच्या रडारवर नसते..क्वचित प्रसंगी टीप मिळाल्यास असे घडू शकते…पण जर एखादी गाडी, व्यक्ती व्यवसाय म्हणून अवैद्यरित्या दारू वाहतूक करत असेल तर राज्य उत्पादन शुल्क अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन असतात आणि संधी मिळताच भरारी पथक गाडी पकडतात. अट्टल धंदेवाले गाडी सोडून पळून जातात पण आपल्या वजनदार शब्दांवर सर्व सहीसलामत होईल अशी आशा असणारे मात्र गोत्यात येतात, तसाच प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
परंतु संबंधित व्यक्ती अवैद्य धंद्यांशी निगडित नाही हे जरी मान्य केलं तरी… त्यांना क्लीन चिट मिळते. मग जाणीवपूर्वक, विनाकारण काहीही दोष नसताना आणि पक्षाचा जबाबदार पदाधिकारी खुलासा करत असतानाही राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी कारवाई करतात…अशावेळी खरं म्हणजे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या पक्षाच्या पदाधिकार्यावर कारवाई झाल्याचा खुलासा देणे आवश्यक होते. परंतु तशाप्रकारचा कोणताही खुलासा संबंधित नेते अथवा पक्षाकडून आला नाही असे का? संबंधित पदाधिकारी नाहक गुन्ह्यात अडकला जात असताना वरिष्ठ लोकप्रतिनिधीनी त्याची दखल घेणे आवश्यक नव्हते का?
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाकडून अटकेची कारवाई झाली तेव्हा संबंधित पदाधिकारी संशयित आरोपीला वाफोली येथील एका गेस्ट हाऊस मध्ये ठेवण्यात आले होते अशी अफवा पसरली होती, ती खरी आहे का?
कोल्हापूर येथील भरारी पथकातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी कोल्हापूर येथील आमदारांचा कॉल आला होता, हे खरं आहे का?
गाडी नेऊन गोव्यातून दारू भरून आणणारा तो पळून गेलेला युवक कोण?
या आणि गाडीत त्यावेळी आणखी कुणीतरी व्यक्ती होती… ती व्यक्ती रिक्षाने सावंतवाडीत गेली अशा अनेक अफवा पसरल्या, त्या कोणी पसरवल्या?
एवढं सर्व होऊनही, राजकीय दबाव येऊनही एका प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी कारवाई केलीच, परंतु संबंधितांकडून करण्यात आलेला खुलासा मात्र हास्यास्पद वाटला. राजकीय पदांचा वापर, राजकीय दबाव तंत्र वापर हा जनहिताची कामे करण्यासाठी की अवैद्य धंदे करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.