You are currently viewing दोडामार्ग-गोव्याच्या सीमेवर चालत्या दुचाकीने घेतला पेट…

दोडामार्ग-गोव्याच्या सीमेवर चालत्या दुचाकीने घेतला पेट…

सुदैवाने दुचाकीस्वार युवक बचावला; मात्र गाडी जळून खाक….

दोडामार्ग

शहराला लागून असलेल्या साळ-गोवा येथे चालत्या दुचाकीने पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने दुचाकीवरून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी ०९:३५ वाजण्याच्या सुमारास खोलपेवाडी परिसरात घडली. रवी हरिश्‍चंद्र रेडकर (रा.खोलपेवाडी), असे दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आपल्या खोलपेवाडी येथील घराकडून रवी रेडकर हा युवक आपल्या पल्सर एन. एस. या दुचाकीने दोडामार्ग बाजारपेठेकडे येत होता. खोलपेवाडी-दोडामार्ग च्या हद्दीवर श्री. रेडकर येऊन पोचला असता त्याला दुचाकीतून सायलन्सर मधून अचानक मोठा धूर येत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्याने तात्काळ दुचाकी थांबवली. दुचाकीला आग लागल्याचा अंदाज येताच काही क्षणात दुचाकीवरून बाजूला होत. श्री. रेडकर यांने पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. मात्र तोपर्यन्त आगीने दुचाकीला घेरले होते. यादरम्यान डिचोली येथील अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले होते. परंतु तोपर्यन्त दुचाकी जळून खाक झाली. घटनास्थळी गोवा-दोडामार्ग पोलिसांनी रीतसर पंचनामा केला असून आगीत दुचाकी जळून सुमारे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे रवी रेडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा