You are currently viewing माणगाव दत्त मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा

माणगाव दत्त मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा

कुडाळ :

माणगाव तीर्थक्षेत्र येथील दत्त महाराज, प.पू.टेंब्येस्वामी महाराज आदी मूर्तींचा पंचकुंडी पुनश्चप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त बुधवार २५ ते २७ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथील दत्त मंदिर येथील करण्यात आले आहे.

बुधवार, २५ रोजी सकाळी गणपती पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी ४:३० वा. ‘भक्ती संगीत’ कार्यक्रम, ७: ३०वा. कणकवली येथील नरहर करंबेळकर यांचा ‘रामकथा व गीत-रामायण’ कार्यक्रम होणार आहे. गुरुवार २६ रोजी सकाळी ७ पासून देवता स्थापना, पूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ४:३० वा. पूर्णीमा पारखी व सहकारी, मुंबई यांचा ‘निसर्गातून शिकवण श्री दत्तगुरूंचे २४ गुरु’ हा कार्यक्रम, सायंकाळी ७:३० वा. गोमंतक दत्त मंडळ कीर्तन विद्यालय, फोंडा गोवा व सुहास बुवा यांचे वझे यांच्या विद्यार्थ्यांच्या चक्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे .
शुक्रवार, २७ रोजी सकाळी ७ वा. मूर्ती प्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करवीरपीठ कोल्हापूरचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य तसेच प.पू. वल्लभानंद सरस्वती, गाणगापूर व प.प.वामनानंद सरस्वती, औदुंबर आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७:३०वा. तत्वकलश, उत्सवमूर्ती, दत्त महाराजांच्या पादुकांचे ‘श्रीं’च्या जन्मस्थानाकडून दत्त मंदिरपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणुकीने आगमन होणार आहे.

नंतर प्राणप्रतिष्ठा, महापूजा, अतिथी सत्कार होणार आहेत. दुपारी १२:३० वा. महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद असून सायंकाळी ४.३०वा. प्रथमेश लघाटे ,संगमेश्वर यांचे गायन, ७:३० वा.चिंचवड-पुणे येथील सौ.वंदना घांगुर्डे व सहकाऱ्यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती माणगाव येथील दत्त मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष सुभाष भिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा