You are currently viewing नांदगाव तिठा सर्व्हिस रस्त्यासाठी उद्या उपोषण…

नांदगाव तिठा सर्व्हिस रस्त्यासाठी उद्या उपोषण…

कणकवली प्रांत कार्यालयासमोर सकाळी १० पासून उपोषणाला प्रारंभ…

कणकवली

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्ता खुला होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्धार नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे. उद्या सकाळी १० वाजता कणकवली प्रांत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू होणार आहे.

नांदगाव तिठा येथील एका बाजूच्या सर्विस रस्त्यासाठी नलावडे घर परिसर भुसंपादन आवश्यक आहे. संबंधित वाढीव जमिनीचा मोबदला निवाडा नोटीस नलावडे कुटुंबीयांना देण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या घरासमोरील शेडचा मोबदला देण्यासाठी निवाडा तयार करुन महामार्ग प्राधिकरणकडे मंजुरी साठी पाठवण्यात आलेला आहे. तरीही नलावडे कुटुंबीय सहकार्य करत नसल्याचा आरोप नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला आहे.

जोपर्यंत नलावडे घर परिसरामध्ये भुसंपादन होत नाही तोपर्यंत सर्व्हिस रस्ता होणार नाही. प्रांतअधिकारी तसेच हायवे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण घेवून सर्व्हिस रस्ता खुला करावा, सध्या होणारे अपघात रोखण्यासाठी व लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे यासाठी लोकशाही पद्धतीने साखळी उपोषण कणकवली प्रांत कार्यालय समोर छेडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा