You are currently viewing रेशनकार्डधारकांना तातडीने धान्य पुरवठा न केल्यास ठिय्या आंदोलन

रेशनकार्डधारकांना तातडीने धान्य पुरवठा न केल्यास ठिय्या आंदोलन

माकपचा पुरवठा अधिका-यांना निवेदनाव्दारे इशारा

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील सर्व रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्याबरोबरच मे महिन्यातील
नियमित व मोफतचे धान्य तातडीने न मिळाल्यास पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आज मंगळवारी माकपच्या वतीने पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.यावेळी शिष्टमंडळाने पुरवठा अधिका-यांना धारेवर धरत रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराचा पाढा वाचून दाखवला.

इचलकरंजी शहरात यंञमाग उद्योग व त्याच्याशी निगडीत उद्योगातील रोजगाराच्या संधीमुळे विविध ठिकाणची कामगारांची कुटूंबे कायमस्वरुपी स्थायिक झाली आहेत.यातील सर्व रेशनकार्डधारकांना मागील महिन्यातील नियमित व सोबतचे धान्य मिळालेले नाही.याबाबत रेशन धान्य दुकानदारांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.परिणामी हक्काचे रेशन धान्य मिळत नसल्याने रेशनकार्डधारकांना उपाशी राहण्याची वेळ येत आहे.मागील महिन्यात मोफतचे गहू येवूनही त्याचे वाटप करण्यात आले नाही.तसेच तांदूळ अत्यंत खराब असल्याने ते खाण्यायोग्य नसल्याचे आता लपून राहिलेले नाही.नवीन तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याने भ्रष्ट कारभाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे आज मंगळवारी माकपच्या वतीने शिष्टमंडळाने
रेशनकार्ड धारकांच्या विविध मागण्यांचे निवेदन पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांच्याकडे सादर केले.तसेच शहरातील सर्व रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्याबरोबरच मे महिन्यातील
नियमित व मोफतचे धान्य तातडीने न मिळाल्यास पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा
पुरवठा अधिकारी
अमित डोंगरे यांना देण्यात आला.यावेळी शिष्टमंडळाने पुरवठा अधिका-यांना धारेवर धरत रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराचा पाढा वाचून दाखवला.
यावेळी माकपचे ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने ,भरमा कांबळे ,सदा मलाबादे , आनंद चव्हाण , नूरमहंमद बेळकुडे , जीवन कोळी ,अंबादास कुणीगिरी यांच्यासह पदाधिकारी , सदस्य व रेशनकार्डधारक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा