सरपंचांसह सदस्यांचा पुढाकार; परिसरातील लोकांना त्रास होणार नाही यासाठी नियोजन…
बांदा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज बांदा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी कचरा डेपोची पाहणी केली. दरम्यान त्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन करून परिसरातील लोकांना त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेवू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, बाळू सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, ग्रामपंचायत कर्मचारी पवार उपस्थित होते.
बांदा शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने शहराला कचऱ्याची समस्या सतावत आहे. तर बांदा ग्रामपंचायत ही समस्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात ही कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपोची पाहणी केली.