You are currently viewing तुला सांगते

तुला सांगते

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम गझल रचना

स्वतःला जपावे तुला सांगते
सुखाने जगावे तुला सांगते

नको वेदनाना मनाशी धरू
मनाने हसावे तुला सांगते

जरी मार्ग खडतर दिसावा तुला
दमानेच घ्यावे तुला सांगते

सदा सत्यवाचा असावी तुझी
जगाने बघावे तुला सांगते

स्वतःच्या सुखाला नको पाहणे
जगाला सुखावे तुला सांगते.

( वृत्त:-सौदामिनी )

शोभा वागळे
मुंबई.
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा