You are currently viewing भानू गोंडाळ यांच्याकडून राष्ट्र सेवादल शिबिरार्थीना श्यामची आई पुस्तकभेट

भानू गोंडाळ यांच्याकडून राष्ट्र सेवादल शिबिरार्थीना श्यामची आई पुस्तकभेट

कणकवली

अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित 5 दिवसीय निवासी राष्ट्रसेवादल शिबिरातील शिबिरार्थीना राजापूर तालुक्यातील जुवाटी हायस्कुल मधील शिक्षक भानू गोंडाळ यांनी श्यामची आई हे पुस्तक भेट दिले

यावेळी जेष्ठ विद्रोही तथा बाल साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर, गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रसेवादल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, अद्वैत फाउंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, भाऊ गोंडाळ, अजिंक्य गायकवाड, श्रीराम चव्हाण आदी उपस्थित होते. आजच्या बालपिढीने श्यामची आई हे पुस्तक वाचावे. श्यामची आई या पुस्तकातून मुलांनी साने गुरुजींवर झालेले संस्कार समजून घ्यावे आणि साने गुरुजींचे विचार आपल्या आचरणात आणावेत या भावनेने गोंडाळ यांनी श्यामची आई हे पुस्तक मुलांना भेट दिले. भानू गोंडाळ हे पेशाने शिक्षक असून वाचनसंस्कृती वाढावी यासाठी स्वकृतिशील धडपड करत आहेत.जुवाटी सारख्या ग्रामीण भागातील मुलांना विविध विषयांवरील पुस्तके, कथासंग्रह, ललित लेख संग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह, स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके वाचायला मिळावेत यासाठी गोंडाळ यांनी पदरमोड करून जुवाटी येथील आपल्या घरीच मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. जुवाटी दशक्रोशीतील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनींना याचा फायदा होत आहे. अद्वैत फाउंडेशन च्या राष्ट्रसेवादल शिबिरातील सहभागी 65 शिबिरार्थीना गोंडाळ यांनी श्यामची आई आणि कोण होता शिवाजी हे पुस्तक मोफत भेट दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा