You are currently viewing आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची निवडणूक बिनविरोध

आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षस्थानी ॲड.प्रमोद वाडेकर तर कार्यकारी अधिकारी पदी ज्ञानेश काळे यांची बिनविरोध निवड

तळेरे:- प्रतिनिधी

आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र यांची पंचवार्षिक निवडणूक आणि पदाधिकारी निवड हॉटेल सरोवर कळवा नाका ठाणे येथे पार पडली.आईस हॉकी असोसिएशन ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एक महत्वाची संघटना आहे. आईस हॉकी असोसिएशन इंडिया यांना भारतीय क्रीडा मंत्रालय आणि IOA तसेच (IOC) हिवाळी ऑलिंपिकची मान्यता असलेली महाराष्ट्रातील जुनी खेळ संघटना आहे.
आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचे नव निर्वाचित सदस्य तसेच पदाधिकारी यांची निवड निर्विवाद आणि बिनविरोध पार पडली. या निवडणुकीसाठी ऍड हॉक कमिटीचे सदस्य, राष्ट्रीय संघटनेचे सदस्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुधीर मिश्रा यांच्या देखरेखे खाली निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
*नवनियुक्त राज्य पदाधिकारी खालीलप्रमाणे-*
अध्यक्ष-ॲड. प्रमोद वाडेकर ( पुणे )- , मुख्य कार्यकारी अधिकारी -श्री ज्ञानेश काळे. (सातारा) ,उपाध्यक्ष- पुरुषोत्तम जगताप (सातारा) – , सचिव-श्री विजयानंद सुरवसे (उस्मानाबाद)- , खजिनदार कु.सरुताई पुजारी (सांगली) – तर
सदस्य म्हणून
श्री संजय पाटील (नाशिक)
श्री अक्षय भोगे (नवी मुंबई)
श्री अजय पाटील (सांगली)
सौ.मीरा डावरे (लातूर)
श्री ऋषिकेश नलवडे (मुंबई)
निवड झाली आहे.
निवड झालेले सर्व पदाधिकारी आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आईस हॉकी या खेळाचा प्रचार व प्रसार करून गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी विविध प्रशिक्षण वर्ग तसेच प्रशिक्षक यांचेसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्य संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय या सभेत विविध समित्यांची नेमणूक करण्यात आली.

 

१)ॲड.प्रमोद वाडेकर
२) ज्ञानेश काळे
३) पुरूषोत्तम जगताप
४)विजयानंद सुरवसे

प्रतिक्रिया व्यक्त करा