You are currently viewing कणकवली शहरातील विद्युत कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

कणकवली शहरातील विद्युत कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून वीज अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कणकवली

पावसाळ्यापूर्वी कणकवली शहरातील विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कटिंगचे काम तातडीने हाती घ्यावे व पावसाळ्यात कणकवली शहरात वीज पुरवठा खंडित होता नये याची पुरेपूर काळजी घ्या. तारांवरील फांद्या कटिंग करिता कणकवली नगरपंचायतची मशनरी उपयोगात घ्या, मात्र काम युद्धपातळीवर पूर्ण करा अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर कांबळे यांना दिल्या. कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मान्सून पूर्व आढाव्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली.

या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर यांच्यासह अन्य सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते. कणकवली नरडवे रोडवर पावसाळ्यात सातत्याने झाडे पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेकदा तारांवर झाडे किंवा त्यांच्या फांद्या पडून विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे या भागातील ट्री कटिंग प्राधान्याने पूर्ण करा अशा सूचना श्री नलावडे यांनी दिल्या. कणकवली नगरपंचायत च्या ट्री कटिंग साठी दोन मशनरी व अन्य साहित्य तयार असून नगर पंचायत कर्मचारी मान्सूनपूर्व कामांसाठी सज्ज आहेत असे समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा