शब्द
शब्दांनाही जपून ठेवा कोषात,
उघडपणे चोरले जातात.
गलक्यात माणसांच्या अचूक,
ज्ञानीच हेरले जातात.
अज्ञानाचे धडे खुशाल बसून,
चारचौघात दिले जातात.
विश्वासाने मिठीत घेऊन हळूच,
निष्पाप गळे चिरले जातात.
चारित्र्याला नाही राहिले कुंपण,
शिंतोडे उडवले जातात.
लपवून ठेवण्याची गोष्ट नाही,
अंधाचेही डोळे उघडे दिसतात.
प्रेमाच्या आणाभाकांचे स्वर,
नाजूक बोलले जातात.
प्रेमभंगाचे आरोप प्रेमावरच,
जाणतेपणी शेकले जातात.
गुज रात्रीचे कानात खोललेले,
क्षणात सारे भुलले जातात.
हसत्या खेळत्या जीवनातल्या,
आनंदाला कायमचेच मुकले जातात…..
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६