सावंतवाडी :
सावंतवाडी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पतंजली योग समिती सावंतवाडी व विठ्ठल मंदिर सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २४ मे २०२२ या कालावधीत सकाळी ६ ते ७.३० या वेळेत विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे पाच दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे संकटांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात व उन्हाळी दीर्घ सुट्टीचा त्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा, याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर विनाशुल्क असून शिबिरात मुलांना व पालकांना ही उपस्थित राहता येणार आहे. असे भारत स्वाभिमान न्यास जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले. शिबिरात तानाजी वरक रामनाथ सावंत, शरद सामंत, दत्ताराम निखार्गे, कालेलकर, मीना सामंत, रावजी परब व प्रमोद चोडणकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.