You are currently viewing जिल्हा नियोजन समितीवर भाजपचा बहिष्कार

जिल्हा नियोजन समितीवर भाजपचा बहिष्कार

आ नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेलेले विकासकामाचे ६५ कोटी रुपये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात येऊन या जिल्हास देण्याचा शब्द पाळ लानाही. सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्याचा आणी जिल्हाचा विकास ठप्प आहे. वादळातील नुकसान भरपाई अजून नाही. रस्त्यांची कामे ठप्प आहेत. ठेकेदाराचे पैसेच न मिळाल्याने रस्ते अपुर्ण आहेत त्यातच पालकमंत्री उदय सामंत यांची मनमानी सुरुच आहे. जिल्हातील विकास कामांच्या याद्या मंजूर करताना विश्वासात घेतले जात नाहीत, या याद्यांवर केवळ पालकमंत्र्यांचीच सही आहे जिल्हाधिकार्‍यांनी या याद्यांवर सही करण्यास टाळले आहे! या पालकमंत्र्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे आपण आजच्या जिल्हा नियोजन समिती सभेवर बहिष्कार घातल्याचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जिल्हा नियोजन समितीची १० जाने. नंतर तब्बल पाच महिन्यांनी ही सभा होत आहे. मात्र पालकमंत्री उदयसामंत यांची सभाशात्र व शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सुचना डावलून मनमानी कार्यपध्दती बाबत आमदार नितेश राणे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. आम नितेश राणे यांची या सभेच्या प्रारंभीच पत्रकार परिषद होत भाजपाच्या वतीने राज्य सरकार चा कारभार, खोळंबलेली विकासकामे, तोक्ते चक्रीवादळात झालेली व न मिळालेली नुकसान भरपाई, अर्धवट असलेले रस्ते, ठेकेदारांची देय रक्कम न मिळाल्याने रखडलेल्या रस्तांची कामे, पशुपक्षी प्रदर्शनात झालेली उधळपट्टी यामुळे जिल्हा वासीय नागरीकांना या कारभाराची मोठी झळ बसली आहे. याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले.

खरेतर जिल्हा नियोजन समीती सभेत विकासावर चर्चा होणे अपेक्षीत होते. पण या जिल्हाच्या जिल्हा नियोजन सभेत अशी चर्चा होताना दिसत नाही. तब्बल पाच महिन्यांनी सभा घेतांना या सभेची व कामांची कार्यपद्दती पालकमंत्री शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार होत नाही. विकास कामे मंजूर करताना लोकप्रतीनीधीना विश्वासात घेतले जात नाही. ज्या कामांच्या याद्या मंजूर करतांना पालकमंत्र्यांची मनमानी आहे. त्यावर त्यांच्याच सह्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या सह्या या याद्यांवर नाहीत. त्यांनी त्या करायच्या टाळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकार्‍यांनाही पालकमंत्र्यांचा हा मनमानी कारभार मान्य नाही असेही यातून उघड होते असेही आम. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाच्या पुरहानी कामाच्या याद्यांही पालकमंत्र्यांनी मनमानी करत हि कामे मंजूर केली. सुस्थितील अन नादुरुस्त रस्ते याचीही पडताळणी केली नाही. त्यामुळे खरोखरच नादुरुस्त रस्ते दुर्लक्षीत राहीले. याकडेही नितेश राणे यांनी लक्ष वेधले.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी जिल्हा परिषदेवर सद्या प्रशासक असून, पालकमंत्रयांनी अधिकार्‍यावंवर दबाव टाकून घाईगडबडीन कृषी पशु पक्षी प्रदर्शन भरवीले. शेतकर्‍यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त न ठरता या कडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवीली. मे महिन्यात अखेरच्याक्षणी हे प्रदर्शन घाईगडबडीने घेउन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असेही आम. नितेश राणे यांनी स्पष्ट करित या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा