You are currently viewing वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी शहरातील ९ अंगणवाड्याना शैक्षणिक साहित्य वाटप…

वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी शहरातील ९ अंगणवाड्याना शैक्षणिक साहित्य वाटप…

बांदा

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बांदा शहरातील युवक निलेश कदम याने दातृत्व दाखवत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा शहरातील ९ अंगणवाड्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच शहरातील आशा सेविकांना देखील साहित्याचे वाटप केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून अंगणवाडी व आशा सेविकांनी काम केले होते. आपणही छोट्या-छोट्या गोष्टीतून मदतीचा हात देऊन आरोग्य सुविधा बळकट करू शकतो याचे उदाहरण निलेश याने देत युवकांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. अंगणवाडी साठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

बांदा सरपंच अक्रम खान यांनी कौतुक करत निलेश याने स्वतःच्या वाढदिवसाचा केक न कापता कोरोनाच्या कठीण काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेविकांसाठी केलेली मदत ही भविष्यात युवकांना प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. निलेश कदम म्हणाले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने सर्वांनीच मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळेच सामाजिक जाणिवेतून आपण प्रशासनास मदत करणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजावे.

यावेळी सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, कास सरपंच भाई भाईप, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, पोलीस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बाळू सावंत, पत्रकार निलेश मोरजकर, सुशांत पांगम, विशांत पांगम, संदीप बांदेकर, ओंकार नाडकर्णी, राकेश केसरकर, ज्ञानेश्वर सावंत, रत्नाकर आगलावे, ऋषिकेश देसाई, ऋषी हरमलकर, शाणु नाईक आदी उपस्थित होते. फोटो:- बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात निलेश कदम यांना शुभेच्छा देताना भाई भाईप. सोबत डॉ. जगदीश पाटील, अक्रम खान व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर )

प्रतिक्रिया व्यक्त करा