सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात कमी वेळेत जास्त पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी नवीन युवा पिढी अनैतिक कामाच्या धंद्यात गुंतलेली निदर्शनात येत आहे.. आई वडिलांचे संस्कार पायाखाली चिरडून तरुणाई वाम मार्गाला लागल्यामुळे येणारा काळ सर्वांसाठी घातक ठरणार आहे.
वेंगुर्ला तालुका सुद्धा याला अपवाद राहिलेला नसून समाजातील जागरूक नागरिकांनी जर वेळीच एकत्र येऊन काहीतरी ठोस पावले नाही टाकली तर आपल्या समोरच अनेक युवक देशोधडीला लागतील.
यासाठीच आज सायंकाळी 6 वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे वरील गंभीर विषयावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदरील बैठकीस सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सुजाण नागरिकांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री. नंदन वेंगुर्लेकर, सचिव- आधार फौंडेशन, सिंधुदुर्ग. श्री. निलेश चेंदवणकर, अध्यक्ष-माझा वेंगुर्ला, श्री. दाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते व श्री. वसंत तांडेल, सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.