जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी यांची अप्रतिम रचना
शब्द फुलांच्या वेलीवरती
गाणे अवघे फुलुन येते
कोण मारीतो शीळ नव्याने
रंग झुला झुलवत येते
इंद्रधनुच्या सप्तरंगात
हिंदोळे मग श्रावण घेतो
झाडावरील सुर कोकिळा
रावा पण साद घालतो
उन्ह पावसाळी लपंडाव हा
केतकी बनात ताल धरतो
आम्रवृक्षही मोहरलेला
हळुवार मग मोर नाचतो
यज्ञ यगाच्या त्या वेदी वर
समिधाची आहुती पडते
दुध घृत अन चरु पडता
वेद ऋचाना बहर येते
चैत्र चांदणे पुनवेची ही
रात नभी मंतरलेली
सडा भरुनी प्राजक्ताचा
फुले अंगणी अंथरलेली
अनादी अनंत परंपरेची
यज्ञ आहुती चालु असते
याग समिधा त्याच असता
ऋत्विजांचे चक्र फिरते
प्रो डॉ जीआर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट 27 एप्रिल 2022