You are currently viewing गणेश चतुर्थीत कोकणसाठी विशेष रेल्वे सोडा ; निलेश राणे 

गणेश चतुर्थीत कोकणसाठी विशेष रेल्वे सोडा ; निलेश राणे 

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन सादर

गणेश चतुर्थी सणात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणात गणेश चतुर्थी सण घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी मुंबईसह राज्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावात येतात. मात्र यंदा कोरोनामुळे चाकरमानी मुंबईतच अडकले आहेत. रेल्वे बंद असून एसटी सेवा कधीपासून सुरू होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येण्या जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

रेल्वेमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात श्री. राणे यांनी म्हटले आहे की, कोकणात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत मुंबईत राहणारे चाकरमानी आपल्या कुटुंबियांसमवेत मोठ्या संख्येने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. मात्र यंदा कोविड १९ च्या साथीमुळे या नागरिकांना गावी जाण्यासाठी फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी रेल्वे हा नेहमीच उत्तम पर्याय असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकण मार्गावरील विविध ठिकाणी जाण्याकरीता सावधगिरीच्या उपायांसह जास्तीत जास्त प्रवासी गाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा