You are currently viewing बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ मध्ये उन्हाळी शिबीर संपन्न

बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ मध्ये उन्हाळी शिबीर संपन्न

कुडाळ :

 

बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल(सीबीएसई) कुडाळ या शैक्षणिक संस्थेमध्ये दिनांक २ मे ते ७ मे या कालावधीमध्ये (समर कॅम्प) मुलांच्या विविध कलागुणांना चालना देणारे उन्हाळी शिबीर घेण्यात आले. यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यामध्ये दिनांक चार मे रोजी डॉ. प्रगती शेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजियोथेरेपी च्या विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत योगासने करून घेतली.

 

तसेच गमतीदार खेळ व संगीत खेळ ऋचा कशाळीकर व इतर शिक्षकांनी घेतले. दिनांक ५ मे रोजी मानसिक आरोग्य यावर पियुषा प्रभु तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच क्राफ्ट पेपर पासून विविध उपक्रम घेतले गेले. दिनांक ६ मे रोजी श्री दिनेश जाधव व सहकारी यांनी कराटे घेतले. तसेच श्री जाधव यांन मालवण यांनी चित्रकलेची प्रात्यक्षिके सादर केली. दिनांक ७ मे रोजी डॉ.सुरज शुक्ला यांनी पोहण्याचे प्रात्यक्षिक घेऊन विविध पोहण्याच्या कौशल्य विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर श्री प्रसाद कानडे व योगेश येरम व इतर शिक्षक वृंद यांच्यासमवेत नर्सिंगच्या काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना रांगोळी प्रात्यक्षिके सादर केली.

यानंतर फन अँड फूड मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे आकर्षक असे प्रदर्शन मांडले होते .या प्रदर्शनातील पदार्थांचा आस्वाद संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूल च्या प्राचार्या शुभांगी लोकरे, यांच्यासमवेत बी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्री परेश धावडे , महिला बा व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण मर्गज तसेच ज्युनियर कॉलेज प्राचार्य श्री अर्जुन सातोस्कर यांनी घेतला. अतिशय उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या समर कॅम्प ची सांगता झाली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा