You are currently viewing वैभववाडी येथे खांबाळे बौद्ध विकास मंडळाच्या वतीने गौतम बुद्ध जयंती साजरी…

वैभववाडी येथे खांबाळे बौद्ध विकास मंडळाच्या वतीने गौतम बुद्ध जयंती साजरी…

वैभववाडी

आपण आता सत्ताधारी जमात झाली पाहिजे. आणि शिक्षण घेऊन संघटित झाल्याशिवाय ध्येय साध्य संघर्ष करू शकत नाही. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह मानवी मूलभूत अधिकारांच्या प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी केला नुसता पाणी चाखण्यासाठी नव्हता. मानवी मूलभूत अधिकार म्हणजे समता, बंधुता, न्याय हे प्रत्येकाला मिळवून देणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. असे प्रतिपादन संत गाडगेबाबा कीर्तनकार तथा आंबेडकरी विचारांचे मार्गदर्शक सगुण जाधव यांनी केले.

खांबाळे बौद्ध विकास मंडळ आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीदिनी अर्थात बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, बुद्धपाठ ग्रहण करून करण्यात आले. यावेळी खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, मुंबई अध्यक्ष कृष्णा कांबळे, मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष केशव कांबळे, भगवान कांबळे, ग्रामीण अध्यक्ष अमृत कांबळे, समतादूत राजू दीनदयाळ, मुंबई कार्यकारणी सदस्य दयानंद कांबळे, जेष्ठ महिला पदाधिकारी सुलोचना कांबळे, युवा कार्यकर्ते रोहन कांबळे, तुषार कांबळे आदी उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम युवा वर्गाने हँडल करून एक नवीन आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकीता जाधव यांनी केले, प्रास्ताविक शितल कांबळे तर आभार स्वप्नाली कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई आणि ग्रामीण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि युवा वर्गाने विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा