भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र, उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समुहाने रहाणे समाजातील चालिरीती समाजातील सर्व मंगल अशुभ कार्यक्रम धर्मानुसार सणवार. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंब मुल आई वडील हे सर्व समाजात रहाणयानेच कळतं . समाज हा व्यक्तिवर आपली पुरेपूर छाप पाडतो आणि काही चांगली वाईट प्रथा यांचाही दबाव असतो. समाजात काही सदन लोक काही निर्धन लोक असतांत त्याचप्रमाणे मजूर भूमिहीन सुध्दा असतात. काही मिळेल ते काम आणि मिळेल ती मजूरी करुन कसबशी अर्धपोटी उपाशी राहून आपली व कुटुंबांचे पालनपोषण करत असतात. त्यातच त्यांचे मानसिक आर्थिक शारीरिक शोषण सदन लोक करत असतात. कारणं या सर्वाला कारणीभूत असतें ती म्हणजे परस्थिती शिक्षण अभाव . रोजगार अभाव अशी विविध कारणांमुळे आजही काही समाज मागासलेले आहेत.
पारावरचया बैठका बंद झाल्या आणि निवडणूक या माध्यमातून ग्रामपंचायत अमलात आली सर्व निर्णय कोणालाही विश्वासात न घेता चार भिंतींच्या आत घेण्यास सुरुवात झाली. समाज समाजातील लोक यांची सर्वोतोपरी गळचेपी करण्यास सुरुवात झाली.
राजकारण हे गजकर्ण लोकांना चांगले चिकटले आणि लोकांना याची सवयी झाली लोक राजकारणासाठी मारामाऱ्या. गुंडगिरी. दहशतवाद. टोळीयुद्ध. मतांसाठी पैशाचा वापर. साम.दाम . दंड. भेद. मतदारांवर दबाव असे प्रकार सुरू झाले . लोकाना राजकारणाची चांगलीच लथ लागली. राजकारणी लोकांनी समाजांचे पाय बांधण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ हे न दिसणारे भुत लोकांच्या मानेवर बसविले. धड उतरण आणि धड जाईना. लोक या भुताच्या माग लागली समाजासाठी . आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. ठक्कर बाप्पा आर्थिक विकास महामंडळ. रमाबाई महिला सबलीकरण व विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ. अशी अनेक महामंडळ समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली. पण यातून समाजांचा कोणताही विकास समाजातील लोकांचा कोणताही विकास झाला नाही. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री व यांचें बगलबच्चे यांनी बोगस कागदपत्रे दाखल करून संपत्ती दिडशे कोटी आणि आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून कर्ज चारशे कोटी असा प्रकार केला. यामुळे समाजाच्या हक्काचे विकासाची कोट्यवधी रक्कम पाण्यात गेली आणि पहिला होता तसाच समाज मागास आणि भिकारी राहिला. हातात काम नाही.मुलाना नोकरी नाही. व्यवसायासाठी पैसा नाही आणि शेवटी हातांची घडी घालून नेत्यांच्या दारात केविलवाणा चेहरा करून उभा राहणारा समाज हा याच नेत्याला निवडणून देण्यास कारणीभूत आहे. दारु पैसा मटन. यासाठी आत्मविश्वास आत्मसन्मान मत विकणारा हाच तो समाज
समाजाने बदलण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब सक्षम करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत म्हणजे शासनाने किंवा राजकारणी लोकांनी स्थापन केलेली मतांच्या आशेने आर्थिक विकास महामंडळ व इतर सर्व भुलवया फसव्या शासकीय निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या चोराच्या किंवा त्यांच्या बगलबच्चे यांच्या पाया पडण्याची गरज नाही. कारणं एक दिवस निवडणूक असली की हेच आपल्या एक वेळ पाया पडतात पण पाच वर्ष आपल्याला यांच्या पाया पडावे लागते त्यासारखे वाईट नाही .
समाजांचे राजकारण व शासन विरहित आर्थिक विकास महामंडळ आपल्याला उभ करता येईल कां? सर्वांना प्रश्न पडला असेल पण काहीच अशक्य नाही कारणं समाज सर्वात मोठा असतो त्याबरोबर एकी सर्वात मोठी असतें . आजचं आपल्या गावांची वाड्या वस्त्या यांची लोकसंख्या किती आहे बघा आणि सर्वांना विश्वासात घेऊन जागोजागी मिटिंगा घ्या आणि समाजांचे हक्काचे स्वनिर्मित आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे विचार समाजावून सांगण्याची गरज आहे . गावातील वंचित गरिब लोकांना एकत्र आणून त्यात प्रामुख्याने मजूर भुमिहीन शेतकरी . शेतमजूर.महिला वयोवृद्ध व्यक्तिंना . अश्या सर्व लोकांना एकत्र आणून एक पतसंस्था मंजूर करा त्यांची शासन नियमानुसार नोंदणी करा . आणि मग आपल्या समाजांचे आर्थिक विकास महामंडळ याची पहिली पायरी तयार होईल. आणि मग आपल्या गावाचा सर्वे करा या ठिकाणी काम करणारे विश्वासातील असावेत. एकही राजकारणी त्यात नसावा हे महत्वाचे ध्यानात ठेवा म्हणजे समजा आपल्या गावांची लोकसंख्या १००० आहे तर गावातील लोकांनी प्रत्येकाने आपल्या घरातील पती पत्नी. आई वडील. मुलगा मुलगी. यांच्या नावाने रोजच्या रोज ## १ रूपया बाजूला काढा आणि समाजाची पतसंस्था आहे त्यात भरा म्हणजे साध सोप गणित तयार होईल रोजचा एक रुपया १०००× १ = ५००० एवढी रक्कम रोज गोळा होणार म्हणजे महिन्याला ५०००× ३० = १ लाख पन्नास हजार महिन्याचे झाले मग १ लाख पन्नास हजार × १२ = म्हणजे १ कोटी ८० लाख रूपये गोळा झाले आत्ता विचार करा समाज सक्षमीकरण करण्यासाठी कशाला पाहिजे नेता पुढारी आमदार खासदार मंत्री शासन पाहिजे गरज नाही आपणांस कोणाची. पण यासाठी आपले विचार आपली एकजूट महत्वाची आहे .
आपल्या समाजांचे आर्थिक विकास महामंडळ तयार झाले. सर्वांचे सर्वांनी आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी स्थापन केलेलं यातील कर्ज व्यवहार करताना सार्वजनिक शासकीय खाजगी बँका पतसंस्था ज्या प्रमाणे अटि शर्ती घालतात त्याप्रमाणे आपणं सुध्दा विविध कारणांसाठी कर्ज वाटप करताना अटि शर्ती समाजातील जामिन असाच नियम घालणे गरजेचे आहे. कारणं खाजगी बँका पतसंस्था बॅंका राष्ट्रीय कृत हे सुद्धा जागा घर जमीन यांचा बॅंकेच्या नावाने दस्त करुन घेतात कर्ज देताना १२/१३ टक्के वार्षिक व्याज असतं आणि वसुली मात्र १८/२० टक्क्यांनी गुंडगिरी जप्ती मालमत्ता लिलाव या मार्गाने वसुली केली जाते मग आपलेच समाजांचे आर्थिक विकास महामंडळ बरे का नाही? विचार करा समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचा आपणास आपल्या समाजातील जे गोरगरीब सभासद आहेत त्यांच्यासाठी सावकाराच्या दारात जाव लागणार नाही. मुलांचे शिक्षण यासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही. मुलींच्या लग्नाला सगेसोयरे मित्रपरिवार यांच्याकडे हात पसरावा लागणार नाही. जाग जमिन घर यासाठी खाजगी बँका पतसंस्था यांच्या व्याजाच्या चककित पिसणयाची गरज नाही. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री आर्थिक विकास महामंडळ यांच्या नावाखाली मतांसाठी तुमच्यावर दबाव आणू शकणार नाही. मयत. यासाठी लागणारी मदत देण्यास समाज सक्षम होणार आहे. दवाखान्यात लागणारे पैसे घालण्यासाठी आपली जमीन घर जागा घाणवट किंवा विकावी लागणार नाही. समाजातील शिक्षित मुलांना एकादा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भागभांडवल यासाठी बॅंका पतसंस्था खाजगी सावकार यांचे उंबरे झिजवावे लागणार नाहीत.शिक्षित मुलांच्या साठी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यास चा़गला मार्ग तयार होईल समाजाची अॅकडमी स्पर्धा परीक्षा वर्ग स्वताच्या असेल हक्काचा रोजगार हक्काचे काम हककाची भाकरी मिळण्यास लोकांच्या दारात जाण्याची गरज पडणार नाही अश्या एक नाही अनेक अडचणी काढण्यासाठी आपलाच हक्काचा एक रुपया आपल्या स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी साधा सोपा मार्ग तयार करून देणार आहे.
असं प्रत्येक समाजांचे आर्थिक विकास महामंडळ असावं असं मी मत व्यक्त करत आहे राजकारणी लोक आणि समाजातील काही समाजकंटक असं होऊ देणार नाहीत.पण आपणं आपल्या मनावर घेण गरजेचे आहे कारणं आपला विचार आपल मत कोणीही हलवू शकणार नाही
आजचं विचार करा ज्यांना माझा विचार पटला असेल तर एक फोन करा समाधानासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९