You are currently viewing तू बुद्ध आहे …

तू बुद्ध आहे …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

तू बुद्ध आहे तू बुद्ध आहे तू बुद्ध ….
साऱ्या मानवतेचा….
ना भेदभाव ना पंथभेद तू तारक, अखिल विश्वाचा …

तुज समिप आला जो जो तो, तुझाच होऊनी रे गेला
जिंकले विश्व नि कलिंग जरी शेवटी फकिर तो झाला…

उघडूनी कवाडे ज्ञानाची, दाविशी दिवा प्रकाशाचा
तुजमुळे थांबला विनाश पुढचा फाकला प्रकाश तो ज्ञानाचा..

येथे ना शाश्वत काही ही सारेच प्रवासी दो घडीचे
जिंकाया निघती माती पाणी जे आहे साऱ्या विश्वाचे …

रे कोण येथला मालक सांगा घेऊनी गेला तो सोबती सारे
मातीच झाली साऱ्यांची हे समजण्यास , विनाश सांग का बरे ?

बुद्धाचा मार्ग तो , अनुसरता रे गळूनी पडती दंभ जगी
वाटली तुझी शिकवण सोपी गुंगते पहा पण सारी मती …

लोभाची मांजरे सारी येथे , रे कशी पचावी शिकवण
जाहला प्रसार नि प्रचार जिथे, जोडती साम्राज्याचे धन ..

तू नाही सोपा बुद्धा रे,वरवरचे सारे वर्ख इथे
काढताच पापुद्रा वरचा, भळभळते बघ ना रक्त तिथे…

तुज पचवावा ऐसा सुज्ञ इथे..? नाही रे नाही कोणी
तुज बुडवून बघना , डोक्यावरूनी गेले रे येथे किती पाणी ..

पण तरी ही तू …
ठाम रहा …तुझी शिकवण सारी “मानवता”
निपजेल बघ रे कुणी तरी …
घेईल ध्वज रे पुन्हा हाता …..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा