You are currently viewing सावंतवाडी मोती तलावाकाठी टाकलेला गाळ पालिकेने उचलला..

सावंतवाडी मोती तलावाकाठी टाकलेला गाळ पालिकेने उचलला..

सावंतवाडी

मोती तलावातील गाळ उपसा मोहिमेनंतर फुटपाथ व मुख्य रस्त्यावर पसरलेली धोकादायक “ती” माती अखेर पालिका प्रशासनाने बाजूला केली. जेसीबी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही माती हटविण्यात आली. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. याबाबतची मागणी आज सकाळीच सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अवघ्या काही तासातच मोहीम राबविण्यात आली.

सावंतवाडी मोती तलावात साचलेला गाळ काढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून नुकतीच मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी “डोजर” च्या साह्याने येथील भोसले उद्यानासमोर मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात आला होता. दरम्यान दोन दिवसापूर्वी ही मोहीम थांबविण्यात आली. मात्र फूटपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा होता. त्यावर काही वाहनांना अपघात झाला. तर मोठा अपघात होण्या आधी ही माती हटविण्यात यावी, अशी मागणी आज सकाळी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत अवघ्या काही तासातच नाही ही माती काढण्यासाठी सुरुवात झाली. त्यासाठी जेसीबी व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने माती बाजुला करुन रस्ता व फुटपाथ सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा