जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना
आईचा आशिर्वाद आहे आमच्यावर
म्हणून आम्ही रोज दिसतो ताज ताज! धृ
पाळणा ती झाली आमच्यासाठी आई
रात्रदिनं जोजविले होऊनीया लाही लाही
पाळण्याची दोर हाती , पाजुनी दूध ताजं! !१!!
कामातही कडेवर बाळ तुझा होता कान्हा
कापडाच्या झोळीत पाठीवरी तुझा तान्हा
तरीही करीतसे माय सारं सारं कामकाज!!२!!
खेळतांना माती माती होई तुझा बाळ
पळतच येऊनिया मज घेई कडेवर
मायेच्या पदराने माय पुसी तोंड माझं! !३!!
माय म्हणे, याला बाबासाहेब करते बघ
पुस्तकाच्या राज्यामधी थोडं धर तग
ज्ञानदूध मी बाळाला पाजते बघ आज !!४!!
आडाणी अंगठा बहादर माझी माय
पेरत राहिली ह्दयात बाबासाहेब माझ्या
सावित्री, फातीमाची तिच्या मनात राज! !५!!
दळतांना ओवी बाबा,फातीमाची गाते
चुलीतल्या तव्याशी बोलते रे जाते
धैर्याच्या सूर्याची भाकरी करीते रोज! !६!!
काटेकुटे नमतात आईच्या हातापुढं
चालतांना लाव्हा फफुटा तो हसतो
पाय दाबता दाबता मला येई निज! !७!!
फेसाटीची काटे जळतांना मला म्हणे
असे जळतील तुझे एक एक असे
त्याची होईल राख, तू होशील वीज! !८!!
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.