बांदा
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२साली बाबा कुलकर्णी यांनी शिक्षणाची मुहर्तमेढ रोवलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद कास नं.१शाळेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गेले वर्षभर वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते .
या महोत्सवाचा सांगता समारोप ७व ८मे या दोन दिवसात विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून समारोह दिमाखदारपणे पार पडला.
भगिरथ प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष डाॅ. प्रसाद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,बांदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे,शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर ,केंद्रप्रमुख अनंत कदम ,सरपंच खेमराज उर्फ भाई भाईप, पोलिस पाटील प्रशांत पंडित , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळा कासकर ,उपाध्यक्ष विंदा पेडणेकर ,मुख्याध्यापिका स्वाती नाईक आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या शतक महोत्सवाचा शुभारंभ झाला.
यावेळी लोकसहभागातून साकारलेल्या सभामंडप,संगणक कक्ष ,डिजिटल कक्ष यांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच शाळेच्या विविध आठवणींची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली , विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ज्ञानकुंभ या हस्तलिखिताचेही प्रकाशन झाले तसेच गेले वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धात्मक उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच शतक महोत्सव कार्यक्रमाला आर्थिक ,वस्तूरूप व श्रमदानसाठी योगदान दिलेल्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यादिवशी शाळेतील वर्गखोल्यातून कास गावातील महेश पंडित यांनी संग्रहित केलेल्या नाणी व नोटा तसेच विद्यार्थी व शिक्षक यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन खुले करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या कार्याचा गौरव करून कास गावातील एकजुटीतून शाळेचा केलेल्या कायापालटाचे कौतुक केले. या महोत्सवादरम्यान विविध मान्यवरांनी शाळेला भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. दोन दिवस चाललेल्या या शतक महोत्सव कार्यक्रमात ललन पंडित व सहकारी यांचा संगीत रजनी हा गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर झाला , या महोत्सवात शाळेची माझी विद्यार्थीनी प्रतिभा पंडित व सहकारी यांनी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात शाळेचे विद्यार्थी ,शिक्षक,माजी विद्यार्थी व पालक यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण केले. शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी दोन दिवस दशावतारी नाटके सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. या शतक महोत्सववाच्या निमित्ताने शाळा परिसर आकर्षक पणे सजवला होता. सांगता समारोपवेळी १००फुगे विद्यार्थ्यांनी फुगवून हवेत सोडले तसेच शाळा परिसरात मेणबत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र कुकडे यांनी केले तर सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक महेश पालव व उपशिक्षिका स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक प्रकाश गावडे उपशिक्षिका वैभवी सावंत यांसह शतक महोत्सव कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती , माता व शिक्षक पालक संघ, शाळेचे आजी- माजी विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.