बांदा
चालूवर्षी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट व सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं .१केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होऊन सुयश प्राप्त केले.
ब्रेन डेव्हलमेंट या परीक्षेत इयत्ता पहिलीतून समर्थ सागर पाटील याने सुवर्ण पदक ,सिध्दी सुभाष प्रभू शिरोडकर हिला रौप्य तर आयुष रमेश पवार,रूही रामनाथ येडवे,विहान अरुण गवस व नाजुका आसिफ खान या विद्यार्थ्यांनी कास्य पदक मिळवले .
इयत्ता दुसरीतून दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने सुवर्ण तर काव्या सूर्यकांत चव्हाण हिने कास्य पदक मिळवले.
संदेश सावंत युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत इयत्ता चौथी मधून श्रद्धा नारायण आकेरकर व युवराज मिलिंद नाईक यांनी कास्य पदक तर इयत्ता सहावी मधून अमोघ राजेश वालावलकर याने कास्य पदक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर ,वर्गशिक्षका शुभेच्छा सावंत , रंगनाथ परब, वंदना शितोळे, रसिका मालवणकर ,शितल गवस , जागृती धुरी,लुईजा गोन्सलवीस ,उर्मिला मोर्ये,रंगनाथ परब,सरोज नाईक ,जे.डी.पाटील ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,सरपंच अक्रम खान व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.