You are currently viewing केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपा सरकार हवे; तरच गतिमान विकास

केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपा सरकार हवे; तरच गतिमान विकास

– गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण भाजप कार्यालय येथे व्यक्त केल्या भावना

मालवण

गोवा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ जनतेपर्यंत पोहचवणे सुलभ होते.केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपा सरकार यायला हवे तरच गतिमान विकास होईल. महाराष्ट्रातही लवकरच डबल इंजिनचे सरकार यावे. अश्या भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण दौऱ्यावर व्यक्त केल्या.

अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशन निमित्ताने मालवण दौऱ्यावर आलेल्या गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण भाजप कार्यालय येथे भेट दिली. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा भव्य सत्कार केला.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाऊ सामंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजू केनवडेकर, उद्योजक दीपक परब, विलास हडकर, विशाल परब, राजू आंबरेकर, आबा हडकर, जॉन नरोना, अजय शिंदे, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, दाजी सावजी, भाई मांजरेकर, प्रमोद करलकर, बाबू कदम, महिला आघाडी शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा वेरलकर, माधुरी बांदेकर, नमिता गावकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास भारतीय जनता पार्टीमुळे शक्य झाला. जनतेचा पाठिंबा मिळाला पक्षाने नेहमीच विविध जबाबदारी देऊन विश्वास दाखवला. आज दुसरी टर्म मुख्यमंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडत असताना केंद्रात सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान कामांमुळे अधिक ऊर्जा मिळते. आपल्या सारखी ऊर्जा महाराष्ट्रात मिळावी यासाठी येथेही डबल इंजिन सरकार गरजेचे आहे. अश्या भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आदर्शवत कार्य-निलेश राणे

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांचा आदर्श कार्यकर्त्यांमध्ये आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या साध्या राहणीमानाचे कौतुक वाटते. कुठे गोव्याचे मुख्यमंत्री आणि कुठे महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. बाहेर पडले तर काय बोलतात समजत नाहीत. असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
भाजप पक्षात प्रत्येक गोष्टीचे महत्व असते. पक्ष कार्यालयालाही मोठे महत्व आहे. याचा विचार करता गोवा राज्याचे मुख्यमंत्री मालवण दौऱयावर असताना त्यांनी मालवण भाजप कार्यालयात सर्व पदाधिकारी यांची भेट घेण्याचे निश्चित केली. जनतेशी कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले नेतृत्व यातून स्पष्ट होते, असे कौतुकोद्गार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कामाचे कौतुक
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर चांगले काम सुरू आहे. गोवा राज्यातही त्यांनी गुंतवणूक करण्याची तयार दर्शवली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जनहिताचे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत या निमित्ताने यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा