वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात शास्त्रीय संगीत शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या ” श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग” व आजगाव येथील “स्वयंभू कला क्रीडा मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक 2022” या स्पर्धेचे आयोजन दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव येथे करण्यात आले आहे. या अंतर्गत शनिवार दिनांक 28 मे रोजी शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल) तर रविवार दि. 29 मे 2022 रोजी सवेष साभिनय नाट्यगीत स्पर्धा घेण्यात येत आहे..
‘शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल ) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील निवासी स्पर्धकांसाठी मर्यादित असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रू. 5501 व राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख र. 3501 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख रुपये 2501 व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रु. 1501 तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रोख रु.1101 आहे. प्रवेश शुल्कासहीत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या 17 स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. ‘सवेष साभिनय नाट्यगीत स्पर्धा’ दोन गटात घेण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी स्पर्धकांसाठी मर्यादित आहे.
लहान गट वयोमर्यादा आठ ते सोळा वर्षे असून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रुपये 3333 व राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 2222 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख रुपये 1111 व सन्मानचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक असे स्वरूप आहे. मोठा गट वयोमर्यादा 17 ते 35 वर्षे असून प्रथम पारितोषिक रु. 5555 व राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख रु. 3333 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 2222 वसन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख रुपये 1111 व सन्मानचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक असे स्वरूप आहे. मोठा गट वयोमर्यादा 17 ते 35 वर्षे असून प्रथम पारितोषिक रु. 5555 व राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख रु. 3333 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 2222 व सन्मानचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक असे स्वरूप आहे. दोन्ही गटात प्रवेश शुल्कासहित प्रथम नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकी 15 स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी श्री हेमंत दळवी 9423585792 सौ वीणा दळवी 9423819092 श्री अविनाश रायशिरोडकर 9527118128 यांच्याशी संपर्क साधावा.