You are currently viewing प.पु.विनायक (अण्णा) राऊळ महाराज मूर्ती व गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

प.पु.विनायक (अण्णा) राऊळ महाराज मूर्ती व गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

पिंगुळी :

प.पु.विनायक (अण्णा) राऊळ महाराज मूर्ती व गुरु पादुका प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने सकाळी ५:३० वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमास सुरुवात सकाळी काकड आरती, मूर्ती प्रदक्षिणा, प्रतिष्ठा, तत्त्वन्यास, हवन, महापूजा, लघु पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद, नैवेद्य, आरती, कलशारोहण, अण्णा महाराज यांचे निस्सीम भक्त ट्रस्टी उद्योजक श्री. सुवर्णाजी आमोणकर यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता संपन्न झाले.

यावेळी उद्योजक विश्वस्त श्री अनिल भाई खवटे, उपेंद्र रायकर गोवा, श्री अशोक कदम मुंबई, श्री महादेव पांगे, विनायक पाटील आणि राऊळ महाराज सेवा ट्रस्ट आणि अण्णा महाराज चारीटेबल ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व विश्वस्त भक्तगण उपस्थित होते.

राऊळ महाराज समाधी मंदिर, अण्णा महाराज समाधी मंदिर आणि परिसरातील इतर मंदिराची सजावट, डेकोरेटर श्री अजित आंगणे, श्री किशोर नेवरेकर, श्री सुधीर नेवरेकर, अॅड. सुरज कुडाळकर आणि सहकारी यांनी केले. माऊली आणि बल्लाळ देखावा, कमल मोहिनी, महालक्ष्मी देखावा, श्री महेश कुडाळकर यांनी साकारलेला मूर्ती मिरवणूक, सजावट श्री निकम प्रसाद दळवी आणि सहकाऱ्यांनी केली.

सकाळी ९ वाजता श्री दत्त संगीत भजनी मंडळ बच्चे सावर्डे कोल्हापूर यांचे सुश्राव्य भजन, सकाळी १० वाजता सौ सुजाता विनय पाटील लिखित ‘सद्गुरू समर्थ अण्णा महाराज लीलामृत’ पोथीचे प्रकाशन आणि बाळ कालेकर संपादित ‘सद्गुरू समर्थ राऊळ बाबा’ या मासिकाचा विशेषांक प्रशासन पप्पू बाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दुपारी ११ ते १२ सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ११.३० वाजता श्री ची आरती दुपारी १ ते रात्री ११ वाजता अखंड महाप्रसाद, दुपारी २.३० ते ३.३० साटेली भेडशी दोडामार्ग येथील सुप्रसिद्ध कलाकार श्री अरुण वासुदेव गवंडकर (थायलंड पुरस्कार विजेते) यांचा मनोरंजक नकलांचा कार्यक्रम, सायंकाळी ४.३० ते ५.३० देश-विदेशात सुप्रसिद्ध असलेल्या गायिका कविता देशपांडे यांचे सुश्राव्य गायन, सायंकाळी ६.३० वाजता सांज आरती, सायंकाळी ७.३० वाजता रणरागिनी ढोल पथक वालावल यांच्या ढोल पथकात सहित ची पालखी मिरवणूक सोहळा, रात्री ८ ते ९ सिद्धिविनायक प्रसादिक भजन मंडळ, कुडाळ यांचे काव्य भजन, रात्री ९ वाजता युवा नृत्य महोत्सव, संतांचे अभंग आणि मराठी लोकनृत्य आविष्कार चिमणी पाखरे कुडाळ भूषण बाकरे, ओम साई सावंतवाडी, सिद्धार्थ ग्रुप पिंगुळी, जाधव पेंडूर मालवण, मा. श्री किरण आचरेकर मुंबई यांच्या सौजन्याने इत्यादी संपन्न झाले. या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा