वेंगुर्ले
वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत . शहरातील कचरा उचलत जात नसल्याने शहरात कचरयाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . याबाबत भाजपा ने आवाज उठवला आहे , तसेच त्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भाजपा ठामपणे उभा राहिला असुन या प्रश्नाची उकल होण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावा अशी मागणी केली .
भाजपा शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करताना सांगितले की वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आदर्शवत असुन अनेक राज्यस्तरीय व केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत . यामध्ये या कंत्राटी स्वच्छता कर्मचारयांचा मोलाचा वाटा आहे . परंतु प्रशासकीय कारभार सुरु झाल्यापासून त्यांच्या पगाराच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही . म्हणून जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून सदर कामगारांच्या पगाराचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे ताबडतोब पाठवीण्याबाबत मुख्याधिकारी यांना निर्देश द्यावेत अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली .
तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून काम करत असलेले प्रांताधिकारी यांचीही सावंतवाडी येथे जाऊन भेट घेतली व लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली .
नगरपरिषद कामकाजावर परीणाम
कंत्राटी कामगार कमी झाल्याने कायम असलेल्या कामगारांवर कामाचा ताण आलेला आहे . तसेच नगरपरिषद कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामे सांभाळणारे अधिकारी/कर्मचारी यांचा अर्धा दिवस कचरा गोळा करणारया कामावर लक्ष देण्यासाठी जात असल्यामुळे कार्यालयात दुपारी १२ ते १२ = ३० पर्यंत शुकशुकाट असतो . परिणामी कामांसाठी येणारया नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो व कामही होत नाही . त्यामुळे आगामी काळात प्रलंबित कामांचा डोंगर नगरपालिकेत तर कचरयाचा डोंगर शहरात दिसणार आहे .
कंत्राटी कामगार प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचे लक्ष वेधले
प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे निर्माण झालेली परीस्थिती तसेच विकास कामांवर झालेला परीणाम याची दखल वरीष्ठ पातळीवर घेण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना मेल द्वारे निदर्शनास आणले आहे , तसेच लवकरच वेंगुर्ले भाजपा चे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन कंत्राटी सफाई कामगारांना न्याय देणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .