कुडाळ :
तालुक्यातील कालेली सरपंच पदी शिवसेनेच्या सौ सानिका परब यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली.
कालेली सरपंच पदी थेट सरपंच शिवसेनेची महीला होती. परंतु गेल्या काही महीन्यात ती भाजपवासी झाल्याने कालेली गावातील ग्रामस्थांनी असंतोष प्रकट केला होता. कारण कालेली गावामध्ये खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे मोठ्या प्रमाणात चालु होती. परंतु सरपंचपदी अचानक भाजपच्या प्रवेशानाने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
अखेर ग्रामसभा होऊन अविश्वास ठराव करण्यात आला. त्यामुळे आज नविन सरपंच म्हणून शिवसेनेच्या सौ. सानिका परब यांची बिनविरोध निवड करण्याचे आदेश आ. वैभव नाईक यांनी दिल्यानुसार निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, शाखाप्रमुख दाजी पडकिल, शिवसेना विभाग प्रमुख रामा धुरी यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीनेश परब, ग्रामपंचायत सदस्य सुनिल परब, ग्रामपंचायत सदस्य महेश कालेलकर, ग्रामपंचायत सदस्या आरोही चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या वर्षा घाडी, दीपमाला नाईक, दत्ताराम सावंत, आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच पुन्हा शिवसेनेचाच बसणार पुर्ण बहुमत शिवसेनेचे होते. नुतन सरपंच बसवण्यासाठी कृष्णा धुरी, बबन बोभाटे, रामा धुरी यांनी प्रयत्न केले.