You are currently viewing दोडामार्ग गोवेकर कॉलनीतील बहुचर्चित गार्डन व ओपन जिमचे लोकार्पण कॉलनीतील चिमुकल्या मुलाच्या हस्ते

दोडामार्ग गोवेकर कॉलनीतील बहुचर्चित गार्डन व ओपन जिमचे लोकार्पण कॉलनीतील चिमुकल्या मुलाच्या हस्ते

*दोडामार्ग :*

दोडामार्ग गोवेकर कॉलनीतील बहुचर्चित गार्डन व ओपन जिमचे लोकार्पण मंगळवारी कॉलनीतील चिमुकल्या मुलाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दोडामार्ग येथील प्रथितयश उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी “दोडामार्ग शहर उभारी घेत असताना शैलेश सारखे योगदान देणारे युवक तयार झाले पाहिजेत, तरच दोडामार्गचा खऱ्या अर्थाने विकास होईल. शहर विकासासाठी आज उद्योजक आणि तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. शासकीय लोकांनी शैलेश सारख्या योगदान देणाऱ्या तरुणांना अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जिथे जिथे शैलेश सारखे जे कोण युवक आपल्या शहराच्या विकासासाठी योगदान देतील त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे” असे प्रतिपादन केलं.

या गार्डनची स्वखर्चाने निर्मिती करणारे उद्योजक व बिल्डर शैलेश गोवेकर, हर्षवर्धन नेवगी यांनी सुमारे 22 लाख इतकी रक्कम खर्ची घालून हे सुसज्ज गार्डन उभारले आहे. मंगळवार पासून हे गार्डन गोवेकर कॉलनीतील नागरिकांसाठी खुले करण्यात आले. लहान मुलांनी फित कापत गार्डन मध्ये इन्ट्री मारताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. अगदी लहानापासून अबाल वृद्धापर्यंत साऱ्यांनाच विरंगुळ्याचे एक उत्तम ठिकाण शैलेश गोवेकर यांनी दोडामार्ग शहरात उपलब्ध करून दिलंय. नगरपंचायतच्या ओपन प्लेस मध्ये साकारलेल्या या गार्डनचा गोवेकर कॉलनीतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या उद्घाटन समयी उपस्थित नागरिक व मान्यवरांनी सुसज्ज गार्डन बाबत शैलेश गोवेकर यांचं कौतुक केलं.

यावेळी चिमुकल्यानी फित कापून केलेल्या लोकार्पण सोहळ्यास दोडामार्ग येथील प्रथितयश उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, डॉ. ज्ञानेश्वर एवळे, पत्रकार संदीप देसाई, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक उद्योजक शैलेश गोवेकर, हर्षवर्धन नेवगी, राकेश धरणे व नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा