You are currently viewing मनोरंजन मंडळातर्फे मनोरंजन – प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन

मनोरंजन मंडळातर्फे मनोरंजन – प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन

इचलकरंजी

इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्यातर्फे मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला १२ मे ते २१ मे या कालावधीत दररोज रात्री साडेनऊ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.
या कालावधीत १२ मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वक्ते व समुपदेशक रमेश परतानी, हैदराबाद यांचे सुजाण पालकत्व या विषयावर व्याख्यान होणार असून १३ हे रोजी प्रसिद्ध कलाकार
विभावरी देशपांडे, चंद्रकांत काळे आणि गिरीश कुलकर्णी यांचा आज या देशामध्ये हा मर्मभेदी कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.
१४ मे रोजी अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे प्रेरणांचा प्रवास या विषयावर व्याख्यान होणार असून १५ मे रोजी समाज माध्यमावरील प्रसिद्ध लेखक व अभ्यासक धनंजय देशपांडे पुणे यांचे सायबर क्राईमचा धोका, वेळीच ओळखा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
१६ मे रोजी साहित्यिक व कथाकथनकार संजय कळमकर, अहमदनगर यांचा हसण्यासाठी जन्म आपला हा कार्यक्रम, १७ मे रोजी निवृत्त आयएएस अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव महेश झगडे यांचे लोकशाहीचे आरोग्य आणि प्रशासन या विषयावर व्याख्यान होणार आहे.
१८ मे रोजी विजापूर येथील लेखक व इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. अब्दुल इमारतवाले हे आदिलशाही मराठेशाही आणि छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्यान देणार असून १९ मे रोजी प्रतिभासंपन्न कवी ना.‌ धो. महानोर लिखित अजिंठा या दीर्घ काव्याचा रंगमंचीय सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.
२० मे रोजी माणदेशी बँक व फाउंडेशनच्या संस्थापक, राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार प्राप्त चेतना सिन्हा यांचे परिवर्तनाच्या वाटचालीतील धडे या विषयावर व्याख्यान तर २१ मे रोजी प्रसिद्ध गझलकार व कवी आणि पत्रकार प्रदीप निफाडकर यांचा मराठी गझल व कवितांचा गझलदीप हा कार्यक्रम होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन मनोरंजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा