रंगनाथ नाईकडे IFS मुख्य वनसंरक्षक नागपूर
अमरावती
संस्कार हे विकत मिळत नसतात ते रुजवावे लागतात .श्री गुरुदेव सेवा मंडळ संस्कार शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे पवित्र कार्य करीत आहे .अशा प्रकारचे संस्कार रुजवणे ही आजच्या काळाची गरज आहे असे उद्गार सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ श्री रंगनाथ नाईकडे IFS यांनी आज अमरावती येथे काढले .स्थानिक साईनगर भागात बुलादिन राठी मूकबधिर विद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात करण्यात आलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वांगीण बालविकास शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिशन IAS चे संचालक प्रा, डॉ. नरेशचंद्र काठोळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी गुरुदेव पिठावर सर्वश्री डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या प्रा.डॉ. पल्लवी एरुळकर सर्वश्री सुनील महाराज लांजुळकर भाऊराव बगाडे शरद व-हेकर सुभाषराव सिंहेदादा प्रवीण शेटे व सुरेशराव देशमुख हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिबिराचे संयोजक श्री विजय माथने यांनी केले.या शिबिरात संपूर्ण विदर्भातून जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी झाले असून सुप्रसिद्ध प्रवचनकार इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांनी देखील या शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबीराचा प्रारंभ पाच मे रोजी झाला असून समारोप 15 मे रोजी होणार आहे. या शिबिराचे आयोजन दरवर्षी नियमितपणे करण्यात येते. याप्रसंगी बोलताना श्री रंगनाथ नाईकडे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी सहनशील सोशिक व्हायला शिकलं पाहिजे .तसेच अभ्यासाबरोबरच संस्कार व्यायाम व संगीत या गोष्टींकडे देखील प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. तुमचे मन संतुलित असेल तर तुमचे शरीर देखील संतुलित राहते आणि म्हणून मुलांनी कष्ट ज्ञान व सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून आपल्या या जीवनाचा विकास केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .आपल्या भाषणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची तसेच सैनिकांची आपण आठवण प्रत्येक वेळेस ठेवली पाहिजे कारण सैनिकांमुळे व शेतकऱ्यांमुळे आपले जीवन नीट सुरू आहे .त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .
प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती. 9890967003