You are currently viewing लोक अदालतमध्ये 348 प्रकरणे निकाली

लोक अदालतमध्ये 348 प्रकरणे निकाली

लोक अदालतमध्ये 348 प्रकरणे निकाली

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यांनी दिनांक 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आली होती. या मध्ये 348 प्रकरणे निकाली  काढण्यात असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली.

          लोक अदालत ही प्रत्यक्ष तसेच मिश्र स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. लोक अदालतमध्ये संपूर्ण जिल्हयात एकुण 3 हजार 355 एवढी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 176 एवढी प्रलंबित प्रकरणे निकाली झाली. या प्रकरणा मध्ये 1,71,16,406/- एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. लोक अदालती मध्ये 1 प्रकरणे आभासी पध्दतीने निकाली झाले. या लोक अदालती मध्ये 4322 वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती व त्यापैकी 172 प्रकरणे निकाली झाली व त्यामध्ये 95, 67, 846/- एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा अध्यक्ष जिल्हा निधी सेवा प्राधिकरण, एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यामध्ये एकुण 15 पॅनल होती.  जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी पॅनेल प्रमुख म्हणुन जिल्हा न्यायाधीश -1 आर. बी. रोटे दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) मुख्यन्यायदंडाधिकारी ए.बी. कुरणे, ए.एम.फडतरे व एम.एस.निकम, सहा. धर्मादय आयुक्त यांनी काम पाहीले.

          राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आर व्ही. रावराणे व महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सीलचे सदस्य ॲङ संग्राम देसाई यांनी विशेष प्रत्यत्न केले व जिल्ह्यातील सर्व वकीलांनी संपूर्ण सहकार्य दिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्हालटकर यांनी या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मदत करणारे जिल्ह्यातील सर्व सन्मानिय विधिज्ञ, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व पोलीस अधिकारी  व कमचारी , जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व कर्मचारी, सर्व पत्रकार व सर्व पक्षकार यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा