जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची अहिराणी बोलीभाषेतील अप्रतिम काव्यरचना
मनी माय माय करू मायनी ते येस याद
नही सुटत हो तिना नही सुटत हो नाद
ऱ्हास समोर तवय नही कयत किंमत
माय जाता सोडीसन तुटी जास हो हिंमत ..
“काय” कितला कठीन रूप्या पैसाना तुटोडा
व्हता इंग्रज ना काय रोज रोज तो हातोडा
चयवयम्हा पडनी संगे बापना पयनी
वर्धा आश्रम गांधीना हरिजनम्हा ऱ्हायनी ..
सुत कातीनी खादीनी जाडीभरडी नेसनी
पोलिसना ससेमिरा घर रातले सोडीनी
घरदार वारावर संसारभी वारावर
कसा कठा तिनी काय सोडीसनी घरदार …
बैलजोडीना पसारा दये रात रात गहू
घट्टा पडना हातले कष्ट करात हो बहू
आते दिसस ती माले याद येस माले भारी
कर्ज बहुत व्हयनं कशी फेडू मी उधारी …
आते दिसस दयता आते दिसस कांडता
घट्या व्हडी व्हडी जीव भलताज दमी गयथा
दये मिरची घरम्हा दये मसाला घरम्हा
नही इसावा जीवले व्हता पसाराज मोठा …
याद उनी कितलीबी आते उपयोग काय
रडू येवो कितलबी नही भेटावं हो माय
माय वाचून संसार आते वाटे सुना सुना
ती गई चालनी ते जनू वाटसं हो गुन्हा ..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ८ मे २०२२
वेळ : रात्री ९ : १८