ओरोस :
महात्मा गांधी सेवा संघ संचलीत दिव्यांग पुनर्वसन केंद्र व आरोग्य विभाग आणि जिल्हा परीषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोठ्या उत्साहात दिव्यागांना वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा सामान्य रुग्णालय ओरोस येथे सर्व दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधनांचे वाटप करण्यात आलेे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपकार्यकारी अधिकारी पराडकर साहेब, जिल्हा चिकित्सक पाटील साहेब, समाजकल्याण अधिकारी चव्हाण साहेब, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे, प्रीतम मठकर, कु.श्रध्दा पाडावे, श्रीधर पवार, आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यामध्ये व्हील चेअर, कानाची मशीन ,वॉकर, एम आर कीट, आदी वस्तुंचे वाटप उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थितीत दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केेले. समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले व कार्यक्रम समारोप झाला असे जाहीर केले.