You are currently viewing “मिथ्या समर्थन” दुर ठेवण्यासाठी पर्यायी इतिहास लिहिणे काळाची गरज – संध्या नरे-पवार

“मिथ्या समर्थन” दुर ठेवण्यासाठी पर्यायी इतिहास लिहिणे काळाची गरज – संध्या नरे-पवार

सावंतवाडीत जनवादी साहीत्य-संस्कृती संमेलनाचे उत्साहात उद्घाटन…

सावंतवाडी

अच्छे दिन आले आहेत,असे सांगून एकमेकांची डोकी फोडण्यास सांगितले जात आहे.हे काही लोकांकडुन सुरु असलेले “मिथ्या समर्थन” बदलणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टींना युवा पिढीपासून दुरू ठेवण्यासाठी पर्यायी इतिहास लेखन करणे काळाची गरज आहे.असे मत जेष्ठ विचारवंत व लेखिका सौ. संध्या नरे-पवार यांनी आज येथे मांडले.
दरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्य श्लील की अश्लिल या वादात न पडता, त्या स्वातंत्र्यांचा उपयोग आपल्यासाठी कसा काय होवू शकतो.या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे,असे ही त्या म्हणाल्या.सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनवादी साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन सौ. नरे-पवार बोलत होत्या
या संमेलनाचे उद्घाटन सिने दिग्दर्शन नागराज मंजूळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष संजय वेतूरकर,सुबोध मोरे,चंद्रकांत जाधव,कीशोर जाधव,संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई,सचिव अंकुश कदम,कार्याध्यक्ष प्रतिभा चव्हाण,उपाध्यक्ष मधुकर मातोंडकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत,राजन गवस,वंदना सोनळीये, रुपेश पाटील,रवी जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सौ.नरे पवार पुढे म्हणाले,या ठीकाणी काही विशिष्ट समाजाने आपल्याला म्हणावा तसा इतिहास लिहीला आहे. त्यामुळे त्याचा फटका येणार्‍या पिढीला सहन करावा लागत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. खरे काय आणि खोटे काय याबाबत नव्या पिढीने माहीती करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावेळी उपस्थित अन्य मान्यवर विकास सावंत,सुबोध मोरे,चद्रकांत जाधव,संजय वेतूरेकर यांनी आपले विचार मांडले.यावेळी संपत देसाई यांनी प्रस्तावना सादर करताना हे संमेलन आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा