विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे गरजेचे-आ. वैभव नाईक
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन “संस्कृती 2022” शनिवारी उत्साहात संपन्न झाले.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री.देवी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान फार्मसी कॉलेजमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक चषक,सर्टिफिकेट व मेडल देऊन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये एकांकिका,गायन, नृत्य, ग्रुप डान्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळे कलाविष्कार अविस्मरणीय होते.एकंदर दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर ट्रॅडिशनल डे देखील कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षणाबरोबरच अंगी असलेल्या कलागुणांना ही तेवढीच संधी देणे गरजेचे आहे.अनेक कलावंतांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांच्या जोरावरच करियर केले आहे. शिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन उज्वल यश संपादन करावे.आपल्या फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तज्ञ प्राध्यापकांकडून दर्जेदार शिक्षण याठिकाणी दिले जाते. त्यामुळेच कॉलेजचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. ही परंपरा आपल्याला कायम टिकवायची आहे असे प्रतिपादन आ. वैभव नाईक यांनी केले.
याप्रसंगी कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, उद्योजक सतीश नाईक, उद्योजक संकेत नाईक, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, प्राध्यापक सौ. मेघा बाणे,प्राचार्य डॉ. गणुरे , उपप्राचार्या प्रा.पूजा पटेल, प्रा. बाबर, प्रा.कुलकर्णी, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. पिसे, प्रा. मर्चंडे व इतर सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कॉलेजच्या अहवालाचे वाचन उपप्राचार्या पूजा पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पिसे यांनी केले.