You are currently viewing देवगडमध्ये १४ व १५ रोजी देवनगरी महोत्सवाचे आयोजन

देवगडमध्ये १४ व १५ रोजी देवनगरी महोत्सवाचे आयोजन

इंद्रधनू देवगड व माजी नगराध्यक्षा ऍड प्रणाली माने यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

देवगड

इंद्रधनू, देवगड आयोजित व माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका ऍड. प्रणाली मिलिंद माने यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व 15 मे रोजी देवनगरी महोत्सवाचे आया॓जन करण्यात आले आहे. हा महोत्सव देवगड शेठ म. ग. हायस्कूलसमोरील भव्य रंगमंचावर होणार आहे. महोत्सवातर्गत विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आया॓जित करण्यात आले आहेत. तसेच सिंधुदुर्गातील प्रथमच मॉम- किडस फॅशन शो स्पर्धा या महोत्सवात घेण्यात येणार असल्याची माहिती इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी व माजी नगराध्यक्षा ऍड. प्रणाली माने यांनी दिली.
यावेळी इंद्रधनू संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, राजीव पडवळ, भावेश पटेल, मिलिंद मोर्ये, दिनेश पटेल, आनंद रामाणे, यतीन कुळकर्णी, वैभव केळकर, शंकर मुणगेकर, साईनाथ सुके, मिलिंद माने आदी उपस्थित होते.

14 मे रोजी सकाळी 10 वा. जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, 10.30 वा. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा (लहान गट), सायंकाळी 4.30 वा. तालुकास्तरीय केक स्पर्धा, 5 वा. लहान मुलांसाठी फनिगेम्स, 5.30 वा. खाऊगल्ली, 5.30 व्रो. महोत्सवाचे उद्घाटन, 6 वा. `खेळ पैठणीचा, बहुमान देवगडच्या सूनबाईचा’, रात्री 8 वा. कराओके गीत गायन व स्थानिक नृत्याविष्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 5,555 रू., 3,333 रू., 2222 रू. व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे एक हजार, 700 रू., 500 रू. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय केक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 2 हजार रू., दीड हजार रू., व एक हजार रू., सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

15 मे रोजी सकाळी 10.30 वा. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा (मोठा गट), सायंकाळी 4.30 वा. तालुकास्तरीय पाककला स्पर्धा (शाकाहारी व मांसाहारी गट, 5 वा. लहान मुलांसाठी `धम्माल मस्ती’, 5 वा. खाऊगल्ली, 6 वा. सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण व सत्कार समारंभ, 7 वा. जिल्हास्तरीय मॉम- किड्स फॅशन शो स्पर्धा, रात्री 10 वा. समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे दीड हजार रू., एक हजार रू., 700 रू. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तालुकास्तरिय पाककला स्पर्धेत शाकाहारी गटासाठी अनुक्रमे रू. 1500, 1000 व 500 रूपये व प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह. मांसाहारी गटासाठी अनुक्रमे रू. 2000, 1500, 1000 रूपये व प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय मॉम- किड्स फॅशन शो स्पर्धेतील विजेत्यास 15,022 रू., उपविजेत्यास 10,022 रू., तृतीय क्रमांकास 5,022 रू. तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धाबाबतची माहिती व नाव नोंदणीसाठी प्रशांत वाडेकर (9422584712/9850245116) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा