जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर यांची मातृ दिनाचे औचित्य साधून लिहिलेली अप्रतिम काव्यरचना
माय लेकराच नातं
जणूं दुधांत साखर
ममतेच्या पदराने
घाली मायेची पाखर
*आई माझी* धैर्यशील
पार संकटं करून
केले ताठ मानेनंच
विश्व उभे शून्यातून
*उक्ती तैशी कृती* असे
नित्य तिचे आचरण
लेकी-सुनेसाठी सदा
मनीं भावना समान
दिले संस्काराचे धन
पहा माणसांत देव
तिची हीच शिकवण
जन्मभरासाठी ठेव
हात पुढे मदतीचा
गरजुंना यथाशक्ती
दिला घासातला घास
किती वर्णावी महती
तिच्या ठायी कृतज्ञता
माझ्या अंतरात भाव
जन्मोजन्मीं हीच असो
*आई माझी* देवा! पाव
भारती महाजन- रायबागकर
चेन्नई
9763204334