You are currently viewing शुक्रवार १३ मे रोजी पांग्रड गावच्या भगवती देवीचा त्रैवार्षिक गोंधळ

शुक्रवार १३ मे रोजी पांग्रड गावच्या भगवती देवीचा त्रैवार्षिक गोंधळ

कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावच्या भगवती देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवार १३ मे रोजी देवी भगवतीच्या मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने 11 मे ते 13 मे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रम :

बुधवार दिनांक ११ मे २०२२

संध्याकाळी ६ वाजता किर्तन

बुवा : हरिहर नातू (पुणे)

हार्मोनियम : बाळकृष्ण नाईक (कुडाळ)

तबला : किशोर सावंत (सावंतवाडी)

गुरुवार दिनांक १२ मे २०२२

संध्याकाळी ७ वाजता भजन डबलबारी

बुवा : ज्येष्ठ भजन सम्राट श्री. ज्ञानु बुवा मर्गज (पांग्रड)

विरुद्ध

बुवा : सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री. प्रकाश पारकर (कासार्डे)

 

शुक्रवार दिनांक १३ मे २०२२

सकाळी

१०.३० देवीची नौबत

११.०० चऊनक्याचे पुजन (तुणतुणे पुजन)

दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसाद

सायंकाळी

६.०० देवीचा जोगवा मागणे

७.०० वाजल्यापासून महाप्रसाद

८.३० मांड भरणे

९.०० ओटी भरणे

११.०० देवी भगवतीचा गोंधळ.

या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान पांग्रड देवस्थान समितीने व पांग्रड ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा