You are currently viewing भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टी मिळते – आर.जे.पवार

भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टी मिळते – आर.जे.पवार

कणकवली

भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टी मिळते.नामस्मरणात विज्ञानही आहे.आणिअध्यात्मसुध्दा.नामस्मरण हे अध्यात्म आणि विज्ञानाचे सार आहे..म्हणून अत्यंत साधा वाटणारा पण मोठ्या अधिकाराला नेऊन पोचविणारा तो अद्वितीय मार्ग आहे. प्रचिती घ्यायची असेल तर अनुभव घेण्याला पर्याय नाही.असे प्रतिपादन कणकवली तहसिलदारआर.जे.पवार यांनी केले.ते शिरवल येथील श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे हरीनाम सप्ताह कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांच्या सोबत बाजीराव काशीद, समीर राणे,अर्जून घुनावत, विकास म्हापसेकर,राजेश शिरवलकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आर.जे.पवार म्हणाले कि ,ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर आणि शिरवल ग्रामस्थ यांनी शिरवल येथील श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरीपाठ, किर्तन,आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन आदी कार्यक्रम करुन हरीनाम सप्ताह साजरा करीत आहेत.त्यांनी भक्तगणांना आणि ग्रामस्थांना नामस्मरणाची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.

पंढरपूरात जसे भक्तीमयवातावरणात निर्माण होते.तसेच भक्तिमय वातावरण शिरवल येथे निर्माण झाले आहे.हरीपाठ,किर्तनातुन समाज प्रबोधन करीत नामस्मरणाच्या माध्यमातून सुसंस्कृत तरुण पिढी घडविण्याचे चांगले काम ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर करीत आहेत.असेही ते म्हणाले.

मनाला उत्तम घडविण्याचे कार्य नामस्मरण करते.सद्गुणांच्या व सद्गविचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते.असे मार्गदर्शन आर.जे.पवार यांनी केले.

यावेळी तहसीलदार आर.जे.पवार यांनी हरीनाम सप्ताह कार्यक्रमाला उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या आणि श्री.विठ्ठल – रखुमाई यांचे दर्शन घेतले.यावेळी श्री.विठ्ठल – रखुमाई मंदिर समिती शिरवल च्यावतीने अध्यक्ष तथा ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी ह.भ.प.प्रकाश सावंत, प्रभाकर करंबेळकर ,सुनिल कुडतरकर,सुरेश कोदे आणि वारकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो : शिरवल ,श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती शिरवलच्या वतीने तहसीलदार आर.जे.पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करताना , समितीचे अध्यक्ष तथा ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर, सोबत सुनिल कुडतरकर, सुरेश कोदे आणि वारकरी मंडळी.

प्रतिक्रिया व्यक्त करा