सण उत्सवाच्या तोंडावर वस्तू महागल्या
नाशिक
नवरात्रोत्सव पंधरवड्यावर आला असताना तेलांसह डाळींच्याही किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. तर डाळी देखील महागल्या आहेत.परिणामी ऐन सणासुदीच्या दिवसांत गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
तेल तडकले अन् डाळी भडकल्या
नवरात्रोत्सवात नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो. नवरात्रोत्सवापासून तर पुढे दसरा-दिवाळीपर्यंत तेलाला मागणी असते. सूर्यफूल तेलात लिटरमागे दहा ते पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे. तर सोयाबीनच्या डब्यामागे ५० ते ७५, सूर्यफूल तेलाच्या दरात १५ लिटरमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींमध्ये किलोमागे पाच ते पंधरा रुपयांची वाढ झाल्याने तेल तडकले.
परिणामी ऐन सणासुदीच्या दिवसांत गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
सण-उत्सवाच्या तोंडावर वस्तू महागल्या
कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली असताना वाढत्या महागाईला तोंड देताना अनेक महिलांनी भाजी, खेळणी व प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा पर्याय निवडला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. डाळींच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर सोयाबीन व सूर्यफूल तेल आयात केले जाते. यात काही अडचणी आल्याने तेलाचे दर वाढले आहेत.