दोडामार्ग
दोडामार्ग मधील युवा पत्रकार रत्नदीप गवस यांना केर येथील फ.रा प्रतिष्ठानने ‘आदर्श पत्रकारीता युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. २ मे ला झालेल्या प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांना हा पुरस्कार वितरीत करण्यात आला आहे. यापूर्वी गवस यांना जिल्हा पत्रकार संघाचा उद्ययोन्मुख युवा पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
पत्रकारीते बरोबरच सामाजिक चळवळीमध्ये सक्रीय असणारे रत्नदीप हे एक सुस्वभावी, मनमिळावू, शांत व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. पिकुळे (लाडाचे टेंब) येथील रहिवाशी असलेल्या रत्नदीप यांनी बीए पदवीनंतर डिप्लोमा इन जर्नालिझम हा पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गेली १२ वर्षे ते दोडामार्ग येथे पत्रकारीता करत आहेत. सन २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा युवा पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते पत्रकारिता करीत असताना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक , दशावतार कार्यात नेहमीच सक्रीय असल्याने अनेक ठिकाणी गौरव करण्यात आला आहे. कै. रामा रत्नु गवस प्रतिष्ठान पिकुळेेच्या माध्यमातून ते वर्षभर अनेक शैैक्षणिक , सामाजिक उपक्रम राबवत असतात. तसेच दशावतार या कलेप्रती व कलावंताप्रती ते कायम आदराने वागतात. इतकेच नव्हे तर माजी प्रशासकिय अधिकारी मोहन गवस यांच्या माध्यमातून गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैैक्षणिक व आर्थिक मदत मिळवून देण्यातही त्यांचे योगदान असते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
आज पंधराहुन अधिक ठिकाणी गवस यांना सन्मानित करण्यात आलंय. सध्या ते दोडामार्ग व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ – सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य दोडामार्ग तालुका पोलीस ठाणे, स्नेहबंध ग्रुप दोडामार्ग – संयोजक, जनसेवा प्रतिष्ठान – सदस्य,
सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे – सदस्य कै. गुणाजी गवस प्रतिष्ठान पिकुळे – सदस्य, कै. रामा गवस सेवाभावी प्रतिष्ठान पिकुळे – सचिव या संस्थावर कार्यरत आहेत.
फ. रा. प्रतिष्ठानचा ‘आदर्श युवा पुरस्कारा’ नं आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. येत्या काळात आपली पत्रकारिता समाजातील अनिष्ठ प्रकार मोडीत काढण्यासाठी काम करेल असा आशावाद रत्नदीप गवस यांनी व्यक्त केलाय.