You are currently viewing शिवछत्रपती क्रीडापिठांतर्गत खेळाडूंनी सहभाग घ्यावा

शिवछत्रपती क्रीडापिठांतर्गत खेळाडूंनी सहभाग घ्यावा

– प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी

 शिवछत्रपती क्रीडापिठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सन 2022-23 वर्षाकरिता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत आर्वरी, ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमेंटन, शुटींग ,कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक या खेळांसाठी निवासी व अनिवासी प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.

           जिल्हास्तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करण्यासाठी दि.9 ते 11 मे  पर्यंत संबंधित जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालयाकडे तर विभागस्तर चाचण्यांचे आयोजनासाठी दि 19 ते 20 मे  पर्यंत संबंधित विभागीय उपसंचालक क्रीडा संकुलयांच्याकडे. आणि राज्यस्तरीय चाचण्यासाठी दि. 30 ते 31 मे शिवछत्रपती क्रीडासंकूल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे45 येथे चाचण्या होतील.

          सरळ प्रेवशसाठी राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे. अशा खेळाडूंची नमूद केलेल्या खेळाची चाचणी तज्ञ समिती मार्फत घेण्यात येऊन प्रवेश निश्चित करण्यात येतो. (चाचणी करिता पदक सहभाग प्रमाणपत्राची प्रत सादर करावी). क्रीडा कौशल्य चाचणी – राज्य स्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे. अशा खेळाडूंना नमूद केलेल्या खेळाची चाचणी तज्ञ समिती मार्फत घेण्यात येऊन प्रवेश निश्चित करण्यात येतो. (चाचणी करिता सहभाग प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.)अनिवासी प्रवेश प्रक्रिया – अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल व इतर  खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारा नुसार विविध कौशल्यांची चाणी घेऊन त्या आधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. चाचणी करिता पदक प्राप्त प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. असे   श्री.महेश धोत्रे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा