सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य,अनुसूचित जाती जमाती आयोगाचा गुरुवार दिनांक 12 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज .मो. अभ्यंकर असून आर.डी. शिंदे सदस्य (सेवा), के.आर. मेढे सदस्य (सामाजिक व आर्थिक ) यांचा समावेश आहे. यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.12 मे रोजी मुंबई येथून सकाळी 5.10 वाजता जनशताब्दी एक्सप्रसने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12.18 वाजता कुडाळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी 1 ते 3 जिल्हा परिषद, सभागृह येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांच्यासोबत आढावा बैठक. दुपारी 3 ते 4.30 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हयांचा जिल्हा पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्यासोबत आढावा व चर्चा. दुपारी 4.30 ते 5.30 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा.रात्री 8.02 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना.