मुंबई प्रतिनिधी:
शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या संसर्ग मुळे जमाव बंदी आहे आणि त्यातूनच
देशात मोठ्या राजकीय जाहीर सभा आणि मेळाव्यांच्या आयोजनालाही बंदी आहे.
अशा परिस्थितीत दसरा मेळावा मैदानात घेण्याऐवजी फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाइव्ह करण्याची योजना शिवसेना करत आहे.
कारोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी बैठका तसेच जनतेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील सरकारी यंत्रणेच्या संपर्कात आहेत.
कोरोनाची बाब लक्षात घेता यंदा शिवसेना मैदानात जाहीर सभा घेण्याऐवजी सोशल मीडियाच्या मदतीने लाइव्ह व्हर्च्युअल सभा घेण्याची तयारी करत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला दसरा मेळावा सोशल मीडियाच्या मदतीने लाइव्ह केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या मदतीने लाइव्ह व्हर्च्युअल सभा घेतली तर शिवसैनिकांना उद्देशून काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे. रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करणाऱ्यांचा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे
अशा वातावरणात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार याविषयी यंदा उत्सुकता आहे.