You are currently viewing दोडामार्ग पोलिसांची मनसैनिकांना नोटीस..

दोडामार्ग पोलिसांची मनसैनिकांना नोटीस..

दोडामार्ग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भुमिका घेतली आहे.राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे नुकतीच पार पडलेल्या सभेत भोंगे उतरवण्याबाबत राज्यसरकारला इशारा दिला होता.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे पडसाद उमटू नये याची खबरदारी घेण्यासाठी दोडामार्ग पोलीसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा काढल्या आहेत.मनसेचे तालुकाप्रमुख सुनिल गवस, उपतालुकाप्रमुख संदिप गवस,व माजी शहरप्रमुख पांडुरंग उर्फ अभिजित खांबल व विभाग अध्यक्ष अभय देसाई आदिंना नोटीसा काढण्यात आल्या आहेत.कायदा सुव्यवस्था बाधा आणण्याचे किंवा दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्ह्यासारखे कोणतेही कृत्य घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा