You are currently viewing बांदा येथील रोजगार मेळाव्यात २५० हुन अधिक जणांना मिळाली नोकरी

बांदा येथील रोजगार मेळाव्यात २५० हुन अधिक जणांना मिळाली नोकरी

बांदा:

श्री बांदेश्वर सेवा -सुविधा केंद्राच्या वतीने बांदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला बेरोजगार युवक -युवतींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात २५० जणांना गोव्यातील २५ हुन अधिक खासगी कंपन्यामध्ये नोकरी देण्यात आली.

गोव्यातील नामांकित कंपन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक व युवतीना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले व मुली यांनी मुलाखतीसाठी याठिकाणी गर्दी केली होती. याठिकाणी विविध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड केली.

 

यावेळी गोव्यातील शाम इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक सखाराम गवस, सरपंच अक्रम खान, शैलेश लाड,सूर्यकांत गाड, सुदर्शन सावंत, जनार्दन सावंत, बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राचे संचालक निलेश मोरजकर, प्रशांत गवस, समीर परब, सौ. रीना मोरजकर, दिक्षा गवस, प्रथमेश राणे, अक्षय मयेकर, भूषण सावंत, प्रवीण परब, अजित दळवी, सौ. स्वरा परब आदी उपस्थित होते.

. अक्रम खान म्हणाले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना गोव्यात रोजगार देण्यासाठी बांदेश्वर सेवा सेविधा केंद्राने पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे. युवकांना नोकरीची नितांत गरज असल्याचे आजच्या मेळाव्यातून निष्पन्न झाले आहे. सखाराम गवस व निलेश मोरजकर यांनी येत्या कळत पावसाळ्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व चंदगड, आजरा तालुक्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचे आश्वासन यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा